hit counter for blogger
About Me


Name: संदीप वि.सबनीस
Home: मुंबई, महाराष्ट्र, India
About Me: काय लिहु ईथे? मी हाच विचार करत आहे अजुन.....सुचले की लिहतो.....!
See my complete profile

Liked it?

Previous Post
Archives
Links
Sunday, July 12, 2009
रविवार सकाळ पण ....
रविवार सकाळ पण आज दादर ला जायचे होते म्हणूनच लवकर उठावे लागले. आवरून स्टेशन वर पोचायला तसा उशीरच झाला आणि नेहमी प्रमाणे मेगा ब्लोक... पुढची लोकल अर्ध्या तासाने अजून. असेच वाट पाहत उभा राहिलो गर्दी मधे.
इतक्यात 'आठवतंय का' ऐकू आले कोण आहे म्हणून पहिले तर कोणीच नाही. परत आवाज आला हा पण आत्ता कळले अरे आतूनच येतो आहे. तेंव्हा जाणवले अरे हे तर 'भूत' भूतकाळाचे. सहसा एकांतात गाढतेच.
मी : काय?
भूत : आठवते आहे का असे वाट बघणे?
मी : हे बघ मला नाही आठवायचे आता काही.
भूत : काय नाही आठवायचे तुला?
मी : हेच कि वाट बघण्या वरून झालेली भांडणे
भूत : कधी रे?
मी : तू जा न आत्ता
भूत : बर
काय काय आठवू? आणि आठवू कशाला ना आता? आता काहीच नाही राहिले? बाकी शून्य आहे...! तिच्या शी असेच झाले नेहमी...काय माहित....वाट पाहण्या वरून भांडण तर ठरलेले...मला वाट पाहायला लागली कि माझा राग आणि तिला वाट पाहायला लागली कि तीचा पुरावा दाखवण्याचा अट्टाहास....कसे ना......पण वाट बघण्या वरून वाट लागणे ठरलेले.....कोणीच कोणाची वाट पाहायला नको असे तुटलेले बंध....आणि त्या बंधाचे आत मधे जळणारे पीळ...
भूत : आणखी?
मी : अरे तू अजून ईथेच?
भूत : आता नक्की जातो माझे काम झाले आजचे.....आणि तसेही तुझी लोकल आली पहा...
मी : काय?
अरे अर्धा तास गेला? एवढ्या गर्दीत आजूबाजूला कोणी आहे याची चाहूल न देता? लोकल पण केवढी भरली आहे ना? असू दे घुसुयात ....आठवणीच्या धक्क्या पेक्षा किती तरी सुलभ असतील ते....चला....

Labels: ,

posted by संदीप वि.सबनीस @ 8:11 AM   1 comments