hit counter for blogger
About Me


Name: संदीप वि.सबनीस
Home: मुंबई, महाराष्ट्र, India
About Me: काय लिहु ईथे? मी हाच विचार करत आहे अजुन.....सुचले की लिहतो.....!
See my complete profile

Liked it?

Previous Post
Archives
Links
Thursday, January 19, 2012
बदल
" बदल हाच जगाचा स्थायी भाव आहे ". (मला वाटते गीते मध्ये म्हणाले आहे)
किती साधे आणि सरळ वाक्य पण किती खोल...
किती सहज म्हणतो आपण "go ahead" पण खरेच असे सहज पुढे जाता येते का जर पुढे काहीतरी नवीन असेल तर?
आणि तेंव्हा तर आणखी अवघड जेंव्हा आपण एका जागी स्थिर उभे असतो आणि बदल झाल्यावर परिस्थिती किती स्थिर होणार याची शाश्वती नसते. सगळेच विचित्र पण हेच अंतिम सत्य.
पण हो बदल तर असलाच पाहिजे. निरंतर एक गोष्ट आपण तरी किती काळ करणार. करूच शकत नाही.
पुढे जात आहोत हा आभास आहे का सत्य हे ताडून तो आभास असेल तर तो बाजूला ठेवून पुढे सरकणे हाच खरा शहाणपणा. नाही का?
बदल स्वीकारणे हि एक प्रकारे जोखीमच आहे ना पण ! पण घ्यायला हवीच हि जोखीम ह्याच अपेक्षेवर कि बदलच आपल्याला मदत करेल या जगात टिकून राहण्यासाठी, पुढे जाण्या साठी.
म्हणतात ना " उम्मीद पे दुनिया कायम हैं |" याच अपेक्षेवर पुढे चालत राहू.
let's move on....

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 12:05 AM   0 comments
Thursday, July 14, 2011
गैरसमज
मी काही तरी बोलताना बोलून गेलो गोड-गैरसमज आहे तुमचा त्यावरून आमचे मित्र सलील ह्यांचे उत्तर
"
गैरसमाजाला चव नसते ते फुटले आणि चाखले कीच चव समझते
आणि प्रत्येकाला वेगळी लागते
"

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 8:45 PM   0 comments
Wednesday, December 29, 2010
शिक्षण आणि नोकरी
शिक्षण फक्त नोकरी साठीच करायचे का?
म्हणजे चागले शिक्षण घेतले तर नोकरी केलीच पाहिजे का?
नोकरी करायची नाही म्हणून काही पण शिक्षण घेतले तर चालेल का?
शिक्षणाचे दुसरे काही फायदेच नाहीत का काय?
आपण ना असे समीकरणच बनवले आहे. अरे?

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 7:13 PM   0 comments
Wednesday, June 9, 2010
बंधने
प्रत्येकालाच बंधने तोडायची असतात, कोणी तोडते कोणी नाही,
पण प्रत्येका पाशी कारण असते,
तोडण्याचे आणि न तोडण्याचे पण.....

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 1:13 PM   1 comments
Tuesday, May 25, 2010
सुख
आपल्याला हवे ते हवे तसे हवे त्या वेळी मिळणे म्हणजेच सुख का?
मग फक्त सुख असले तर चालेल का जीवनात? मग समाधान कशाला म्हणावे?

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 7:33 AM   0 comments
Sunday, July 12, 2009
रविवार सकाळ पण ....
रविवार सकाळ पण आज दादर ला जायचे होते म्हणूनच लवकर उठावे लागले. आवरून स्टेशन वर पोचायला तसा उशीरच झाला आणि नेहमी प्रमाणे मेगा ब्लोक... पुढची लोकल अर्ध्या तासाने अजून. असेच वाट पाहत उभा राहिलो गर्दी मधे.
इतक्यात 'आठवतंय का' ऐकू आले कोण आहे म्हणून पहिले तर कोणीच नाही. परत आवाज आला हा पण आत्ता कळले अरे आतूनच येतो आहे. तेंव्हा जाणवले अरे हे तर 'भूत' भूतकाळाचे. सहसा एकांतात गाढतेच.
मी : काय?
भूत : आठवते आहे का असे वाट बघणे?
मी : हे बघ मला नाही आठवायचे आता काही.
भूत : काय नाही आठवायचे तुला?
मी : हेच कि वाट बघण्या वरून झालेली भांडणे
भूत : कधी रे?
मी : तू जा न आत्ता
भूत : बर
काय काय आठवू? आणि आठवू कशाला ना आता? आता काहीच नाही राहिले? बाकी शून्य आहे...! तिच्या शी असेच झाले नेहमी...काय माहित....वाट पाहण्या वरून भांडण तर ठरलेले...मला वाट पाहायला लागली कि माझा राग आणि तिला वाट पाहायला लागली कि तीचा पुरावा दाखवण्याचा अट्टाहास....कसे ना......पण वाट बघण्या वरून वाट लागणे ठरलेले.....कोणीच कोणाची वाट पाहायला नको असे तुटलेले बंध....आणि त्या बंधाचे आत मधे जळणारे पीळ...
भूत : आणखी?
मी : अरे तू अजून ईथेच?
भूत : आता नक्की जातो माझे काम झाले आजचे.....आणि तसेही तुझी लोकल आली पहा...
मी : काय?
अरे अर्धा तास गेला? एवढ्या गर्दीत आजूबाजूला कोणी आहे याची चाहूल न देता? लोकल पण केवढी भरली आहे ना? असू दे घुसुयात ....आठवणीच्या धक्क्या पेक्षा किती तरी सुलभ असतील ते....चला....

Labels: ,

posted by संदीप वि.सबनीस @ 8:11 AM   1 comments
Wednesday, June 3, 2009
हत्तीने हत्तीच्या चालीनेच जावे...जवळून घोडा पळत गेला म्हणून काय झाले? घोड्याचा जन्मच पळण्यासाठी झाला आहे...

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 5:47 AM   2 comments