hit counter for blogger
About Me


Name: संदीप वि.सबनीस
Home: मुंबई, महाराष्ट्र, India
About Me: काय लिहु ईथे? मी हाच विचार करत आहे अजुन.....सुचले की लिहतो.....!
See my complete profile

Liked it?

Previous Post
Archives
Links
Tuesday, May 29, 2012
बापलेकी
संपादक
पद्मजा फाटक
दीपा गोवारीकर
विद्या विद्वांस


धोपट मार्ग सोडून आहे ना विषय?

खरे तर असले पुस्तक मी वाचायला घेतले असते का शंकाच आहे. पण मला कोणी आवर्जून वाचायला सांगितले आणि खूप नवीन असं काही वाचल्याचा आनंद मिळाला.

'शुभारंभ' मधेच संपादकांनी त्यांचा हा न-स्पर्शलेला, कमी महत्व दिला गेलला विषय निवडण्याचा उद्देश, त्याची कारणे, त्यामागचा विचार, कसे करायचे यावर विचार करून ठरवलेली पद्धत, संपादनातील अडचणी, परिश्रम, अपेक्षा, फल-निष्पत्ती आणि मर्यादा या सर्वांचे उत्तम विवेचन केले आहे. यामुळे वाचताना एक दिशा मिळाली.

लेख लिहिणारे जरी प्रतिथ-यश लोक असले तरी बरेचसे मला माहीतच नव्हते. (अर्थात हा माझा दोष)
पण तरी मानवी संबंधातील तेही वडील आणि मुलगी यांच्या नात्यामधील कंगोरे वाचताना ती व्यक्ती माहित नसल्याचा काही परिणाम झाला नाही. अनुभव विश्व समृद्ध झाले.

अशा वाचनामुळेच आपली विचार क्षमता सुदृढ होण्यास मदत होत असेल ना?

हे संपादन २००४ मधील आहे, आत्ता बदलत्या काळात हे संपादन केले गेले तर मला नक्की वाचायला आवडेल.

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 11:00 PM   0 comments
अपूर्वाई
पु. ल. देशपांडे 

थोड्या साशंकतेनेच मी प्रवास वर्णन वाचायला हाती घेतले होते. मला वाटलेच नाही कि प्रवास वर्णन हा प्रकार मला कधी आवडेल. पण धमाल आली.
माझ्याही परदेशगमनाचे योग आले आहेत नाही असे नाही पण जातिवंत कलाकाराची निरीक्षणे तोच करू जाणे....आणि त्याहून महत्त्वाचे ती निरीक्षणे उत्कृष्टरित्या मांडणे....
आता पुलं सारखा कलाकार आणि लेखक हे सहज रित्या करू शकतो यावर दुमत असण्याचे कारणच नाही.
पूल म्हणतात "मला पाहायला आवडतात माणसे " तेंव्हा वेग-वेगळ्या प्रकारच्या माणसां पर्यंत जायची कसब आहे, त्यांना समजून घ्याची तळमळ आहे.
विविध संकृतीतील विविधता टिपण्याची आणि त्यावर टिप्पणी करण्याची उत्स्फूर्तता आहे.
 मादाम तुसॅद  मेणाचे प्रदर्शन आवडले नाही हे सांगायचा प्रामाणिकपणा  आहे, सुंदरतेचा शोध आहे, विनोदातून नेमके पणावर बोट ठेवण्याची हातोटी आहे.

आपण कुठे जातो तेंव्हा लोक काय पाहतात किंवा करतात या पेक्षा आपल्याला काय आवडते आणि ते तिथे कसे मिळेल किंवा त्या संबधित नवीन काय मिळेल हे पाहणे आणि करणे महत्वाचे....

काही वाक्ये

इंग्रजांची वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता यांची गणित आपल्याशी ताडून पहिले तर ते व्यस्त प्रमाणात आढळेल.

एरवीचा अबोल इंग्रज जेवताना बोलका होतो आणि बडबड्या फ्रेंच जेवायला बसला कि स्वादसामाधीत मूक होतो.
इंग्रज गप्पा मारण्या साठी जेवेल आणि फ्रेंच माणूस जेवायची वेळ झाली कि जागतिक युद्धाच्या तहाची बोलणी थांबवून जेवायला उठेल

शेवटी आयुष्य पुढे सरकताना काही दोर कापीत जावे लागते आणि त्या दिशेची वाट आपल्याला बंद आहे हे ठरवावे लागते. हेच खरे ! मी चित्रकलेचा दोर कापला आहे !


पण  इंग्रजी हि मोठी सहनशील भाषा खरी
तिने आंतरराष्ट्रीय आघात पचवले
इंग्रजाने इंग्रजी समजावून घेण्याचा प्रयत्न केला असेल तितकी स्वःताची भाषा अन्य मुखातून समजावून घेण्याचा इतर कोणीही केला नसेल
जसे वडिलांच्या श्राद्धाच्या दिवसाची विनंती 
As my dead father going to come to dinner tomorrow in the shape of a Brahmin

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 8:58 PM   0 comments
अमेरिका
अनिल अवचट 


अमेरिकेमध्ये राहूनच 'अमेरिका' चे वाचन झाले.
पुस्तकाची पहिली आवृत्ती १९९२ मधील आहे पण गेल्या २० वर्षात थोडे फार संदर्भ बदलले तर परिस्थिती तशीच आहे .
पुस्तक तसे म्हणाल तर थोडेसे नकारार्थी आहे. म्हणजे  बऱ्याच गोष्टी परीक्षणाच्या नजरेतून लिहिल्या आहेत असे वाटले आणि जास्ती भर वाईट गोष्टींवर
अर्पण पत्रिका "नशीब काढायला अमेरिकेत जावू इच्छिणाऱ्या भारतातल्या (तरुण) भाग्याविधात्यांना      काळजीपूर्वक ",
अशी असल्यामुळे कदाचित सामाजिक परिस्थितीची जाणीव  करून द्यायची असेल किंवा मला तसे वाटले असेल.
पण मला पटले आणि आवडले लिखाण

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 7:45 PM   0 comments