hit counter for blogger
About Me


Name: संदीप वि.सबनीस
Home: मुंबई, महाराष्ट्र, India
About Me: काय लिहु ईथे? मी हाच विचार करत आहे अजुन.....सुचले की लिहतो.....!
See my complete profile

Liked it?

Previous Post
Archives
Links
Wednesday, September 4, 2013
अंर्तबाह्य
 रत्नाकर मतकरी
       "प्रस्तावनेच्या निमित्ताने" जे काही लेखकाने लिहिले आहे ते एकदम उत्तम आहे.  गूढ कथा आणि भय कथा मधला फरक अतिशय सुरेख प्रकारे मांडला आहे. त्याच बरोबर आपण काय वाचणार आहोत याचा अंदाज पण दिला आहे.
       काही कथा खूपचं  छान प्रकारे जमलेल्या वाटल्या जशा  - ती गेली तेंव्हा, दुसऱ्या सारखा एखादा, हे सर्व…पूर्वी कधीतरी, होण्टेड हाउस
       काही कथा अनैसर्गिकपणामुळे फार रुचल्या नाहीत.

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 5:28 PM   0 comments
Tuesday, September 3, 2013
हसगत
दिलीप प्रभावळकर

पुस्तकाच्या मागे जयवंत दळवींनी लिहिल्या प्रमाणे हे पुस्तक 'गमतीदार' आहे.  हसण्याचे वेगवेगळ्या प्रकारांचे अनुभव देते हे पुस्तक.  एकदम साध्या, सरळ आणि व्यवहारातल्या गोष्टी… आपल्या आजूबाजूच्या…. पण त्यामुळे थोडा कारुण्याचा पदर राहतो…हो पण तरीही आपल्याला प्रसन्न करायला कमी पडत नाही ह्या मधील कोणतीही कथा.





Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 7:11 PM   0 comments
Vally of fear
Sherlock Holmes
         Sir Arther Konan
   
अनुवादक
    विवेक जोशी
Sherlock Holmes बाबत काय लिहू? मस्त वेग, रहस्य आणि त्याचा उलघडा.
अनुवाद चांगला केला आहे.

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 6:58 PM   0 comments
मराठी वाङ् मयाचा (गाळीव) इतिहास
   पु. ल. देशपांडे

पूर्ण पुस्तकच विडंबनात्मक आहे. सगळेच संदर्भ माहित नसले तरीही पुलंच्या शैलीमुळे पुस्तकाचा आनंद मिळाला.
कोटी करण्या मधे तर पुल महान आहेतच. आपण विडंबनात्मक वाचत आहोत हि जाणीव प्रत्येक वाक्यात आहे आणि त्यामुळे चेहऱ्यावरचे स्मित कायम राहते.
अज्ञानी माणसाने आपला मोठेपणा दाखवण्यासाठी इतिहास लिहिला तर तो कसा लिहिल हे पुलंनी त्या भूमिकेत पुरेपूर उतरून दाखवले आहे.
उदाहरणार्थ :
किर्तन किंवा भारूडांचे प्रोग्राम आटपून यायला रात्रीचा उशीर झाला [एकनाथांना] तर [बायको] वाड्याचे दार उघडायला सुद्धा येत नसे. "बया दार उघड" हे प्रसिद्ध गीत ह्या अनुभूतीतूनच आकारले असावे

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 6:55 PM   0 comments
Monday, August 5, 2013
समुद्र
मिलिंद बोकील

शाळा नंतर मिलिंद बोकिलांची वाचावयास घेतलेली दुसरी कादंबरी. आयुष्याच्या मध्यावर पोचलेल्या एका सुखी जोडप्याच्या मनात एका विशिष्ठ घटनेवरून उठलेला तरंग म्हणजे समुद्र. समुद्रा शेजारी २ -४ दिवस घालवायला गेलेली ही दोघे जण.
नवरा म्हणून, बायको म्हणून  तसेच पुरुष म्हणून आणि स्त्री म्हणून त्यांचे विचार, भावना, त्याचे हिंदोळे आणि एकंदरच भावबंध पुस्तकात उत्तम पणे मांडले आहेत. काही पटले नाही तरी पुस्तक बाजूला ठेववत नाही तर त्यावर विचार करायला परावृत्त होतो आपण. पुस्तकाने पकड आणि वेग छान राखला आहे.

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 5:57 PM   0 comments
शुभा
अरविंद गोखले

जुने पुस्तक जुना लेखक त्यामुळे जर शंकेखोर मनानेच घेतले हातात …साध्या साध्या २ - ४ पानांच्या गोष्टी आहेत. एक दोनदोन वाचून झाल्या आणि मग हळू हळू पुढे जाता जाता गोखल्यांच्या लिहिण्याच्या पद्धतीचे स्वरूप लक्षात यायला लागले
एक छोटिशी घटना, काही  अगदी छोट्या - जशी नवऱ्याला स्टेशन वर सोडायला गेलेली नववधू , किंवा स्टेशन वर भेटलेले कोणी - पण त्या घटनेच्या वेळी त्या माणसाच्या भावनांचे उलघडलेले पदर, त्यावेळचे विचार, विचारातील विविधता , कदाचित त्यांचे परिणाम…!
सगळ्या गोष्टी एकदम वव्यवहारिक शेवटाच्या आणि वव्यवहारिक म्हणून दुःखीच असे काही नाही...
यामुळे रोजच्या जगातील घटनांचे मनावरील आणि माणसावरील परिणामांचे दर्शन घडले
कधी त्या घटना / भावना आपल्याच असतात, कधी आपण न विचार केलेल्या धक्कादायक पण पटणाऱ्या, कधी प्रसंगावरून विचार करू त्याच्या विपरित सत्य दाखवणाऱ्या...
' सलगी ' कथा सहीच आहे …"वीज काढून घेतली" प्रसंग उत्तमच...
छान वाटले लिखाण… एवढे कि गोखल्यांचे अजून एक पुस्तक आणले आहे वाचायला… 

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 5:45 PM   0 comments
काही खरे काही खोटे

    व. पु.  काळे

नावाप्रमाणे आहे पुस्तक, कथा थोडीशी अतिशोक्तीयुक्त … पण कोंचित हसत हसत डोक्याला खाद्य देनरि… नेहमीप्रमाणे वपुंच्या पद्धतीने

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 5:23 PM   0 comments
Tuesday, May 29, 2012
बापलेकी
संपादक
पद्मजा फाटक
दीपा गोवारीकर
विद्या विद्वांस


धोपट मार्ग सोडून आहे ना विषय?

खरे तर असले पुस्तक मी वाचायला घेतले असते का शंकाच आहे. पण मला कोणी आवर्जून वाचायला सांगितले आणि खूप नवीन असं काही वाचल्याचा आनंद मिळाला.

'शुभारंभ' मधेच संपादकांनी त्यांचा हा न-स्पर्शलेला, कमी महत्व दिला गेलला विषय निवडण्याचा उद्देश, त्याची कारणे, त्यामागचा विचार, कसे करायचे यावर विचार करून ठरवलेली पद्धत, संपादनातील अडचणी, परिश्रम, अपेक्षा, फल-निष्पत्ती आणि मर्यादा या सर्वांचे उत्तम विवेचन केले आहे. यामुळे वाचताना एक दिशा मिळाली.

लेख लिहिणारे जरी प्रतिथ-यश लोक असले तरी बरेचसे मला माहीतच नव्हते. (अर्थात हा माझा दोष)
पण तरी मानवी संबंधातील तेही वडील आणि मुलगी यांच्या नात्यामधील कंगोरे वाचताना ती व्यक्ती माहित नसल्याचा काही परिणाम झाला नाही. अनुभव विश्व समृद्ध झाले.

अशा वाचनामुळेच आपली विचार क्षमता सुदृढ होण्यास मदत होत असेल ना?

हे संपादन २००४ मधील आहे, आत्ता बदलत्या काळात हे संपादन केले गेले तर मला नक्की वाचायला आवडेल.

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 11:00 PM   0 comments
अपूर्वाई
पु. ल. देशपांडे 

थोड्या साशंकतेनेच मी प्रवास वर्णन वाचायला हाती घेतले होते. मला वाटलेच नाही कि प्रवास वर्णन हा प्रकार मला कधी आवडेल. पण धमाल आली.
माझ्याही परदेशगमनाचे योग आले आहेत नाही असे नाही पण जातिवंत कलाकाराची निरीक्षणे तोच करू जाणे....आणि त्याहून महत्त्वाचे ती निरीक्षणे उत्कृष्टरित्या मांडणे....
आता पुलं सारखा कलाकार आणि लेखक हे सहज रित्या करू शकतो यावर दुमत असण्याचे कारणच नाही.
पूल म्हणतात "मला पाहायला आवडतात माणसे " तेंव्हा वेग-वेगळ्या प्रकारच्या माणसां पर्यंत जायची कसब आहे, त्यांना समजून घ्याची तळमळ आहे.
विविध संकृतीतील विविधता टिपण्याची आणि त्यावर टिप्पणी करण्याची उत्स्फूर्तता आहे.
 मादाम तुसॅद  मेणाचे प्रदर्शन आवडले नाही हे सांगायचा प्रामाणिकपणा  आहे, सुंदरतेचा शोध आहे, विनोदातून नेमके पणावर बोट ठेवण्याची हातोटी आहे.

आपण कुठे जातो तेंव्हा लोक काय पाहतात किंवा करतात या पेक्षा आपल्याला काय आवडते आणि ते तिथे कसे मिळेल किंवा त्या संबधित नवीन काय मिळेल हे पाहणे आणि करणे महत्वाचे....

काही वाक्ये

इंग्रजांची वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता यांची गणित आपल्याशी ताडून पहिले तर ते व्यस्त प्रमाणात आढळेल.

एरवीचा अबोल इंग्रज जेवताना बोलका होतो आणि बडबड्या फ्रेंच जेवायला बसला कि स्वादसामाधीत मूक होतो.
इंग्रज गप्पा मारण्या साठी जेवेल आणि फ्रेंच माणूस जेवायची वेळ झाली कि जागतिक युद्धाच्या तहाची बोलणी थांबवून जेवायला उठेल

शेवटी आयुष्य पुढे सरकताना काही दोर कापीत जावे लागते आणि त्या दिशेची वाट आपल्याला बंद आहे हे ठरवावे लागते. हेच खरे ! मी चित्रकलेचा दोर कापला आहे !


पण  इंग्रजी हि मोठी सहनशील भाषा खरी
तिने आंतरराष्ट्रीय आघात पचवले
इंग्रजाने इंग्रजी समजावून घेण्याचा प्रयत्न केला असेल तितकी स्वःताची भाषा अन्य मुखातून समजावून घेण्याचा इतर कोणीही केला नसेल
जसे वडिलांच्या श्राद्धाच्या दिवसाची विनंती 
As my dead father going to come to dinner tomorrow in the shape of a Brahmin

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 8:58 PM   0 comments
अमेरिका
अनिल अवचट 


अमेरिकेमध्ये राहूनच 'अमेरिका' चे वाचन झाले.
पुस्तकाची पहिली आवृत्ती १९९२ मधील आहे पण गेल्या २० वर्षात थोडे फार संदर्भ बदलले तर परिस्थिती तशीच आहे .
पुस्तक तसे म्हणाल तर थोडेसे नकारार्थी आहे. म्हणजे  बऱ्याच गोष्टी परीक्षणाच्या नजरेतून लिहिल्या आहेत असे वाटले आणि जास्ती भर वाईट गोष्टींवर
अर्पण पत्रिका "नशीब काढायला अमेरिकेत जावू इच्छिणाऱ्या भारतातल्या (तरुण) भाग्याविधात्यांना      काळजीपूर्वक ",
अशी असल्यामुळे कदाचित सामाजिक परिस्थितीची जाणीव  करून द्यायची असेल किंवा मला तसे वाटले असेल.
पण मला पटले आणि आवडले लिखाण

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 7:45 PM   0 comments
Wednesday, March 28, 2012
रावीपार
गुलजार

अनुवाद :
विजय पाडळकर
मोहन वेल्हाळ

"कधी गंभीर वाटतात, कधी हलवून सोडतात, कधी हास्याचा शिडकावा करतात, तर कधी औपरोधिक वाटतात" पुस्तकाच्या मागे लिहिलेल्या या सर्व भावना अनुभवल्या मी.
२-४ पानाची कथा. उत्तम लिखाण शैलीत प्रत्येक कथा आपल्याला तिच्या सोबत नेते आणि शेवटच्या काही ओळीत अशी काही गिरकी घेते कि विचारायला नको. हलके फुलके हसू आणणारी कथा ते अंगावर शहारे आणून सुन्न करणारी कथा ....सर्व प्रकार अनुभवले. गुलजारांचे शब्दातील सामर्थ्य दिसते. असे वाटले कि 'त्रिवेणी' ला गद्य रूप दिले आहे.
विजयजीनी गुलजारांचा अजून एक पदर उलघडून दाखवला...धन्यवाद.

एक झलक मिळाली अन्तरजालावर
http://www.bookganga.com/Preview/BooksPreview.aspx?BookId=5458126934985170531

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 11:48 AM   1 comments
Wednesday, October 12, 2011
पार्टनर
व पु काळे

खूप दिवसा पासून वाचायचे होते ....मस्तच एकदम.... खाली ठेववले नाही संपे पर्यंत....
आवडलेली निवडक वाक्य लिहायची म्हणाले तरी खूप होतील पण तरी काही लिहिली पाहिजेतच... एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या पद्धीतीने कसा विचार केला जातो हे व पु नीच लिहावे
पुस्तक परत हातात घेणे होईलच....

हो परत हातात घेणे झालेच आणि परत एकदा संपवूनच खाली ठेवले....
खूप आहेत लिहायला पण थोडे आवरते घेतो....

पोरगी म्हणजे झुळूक
अंगावरून जाते
अमाप सुख देवून जाते
पण धरून ठेवता येत नाही

आपल्याला हवा तेंव्हा
तीसरा माणूस न जाणे
हाच नरक
[नरक याच्या दोन/तीन व्याख्या आहेत बहुतेक पण computer सारखी search ची सोय नाही त्यामुळे सापडल्या नाहीत ]

लक्षात ठेव दोस्त
तुला मी हवा आहे
म्हणून माला तू हवा आहेस

AS WE WRITE
MORE AND MORE
PERSONAL
IT BECOMES
MORE AND MORE UNIVERSAL

शेवटी फोटो म्हणजे तरी काय? --- आपलंच हूल देत गेलेलं वय, पुन्हा आपल्याला भेटायला येतं.

There is not a single example of a happy philosopher.


Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 10:12 PM   1 comments
माळेचे मणी
सुनिता देशपांडे

कथा संग्रह...काही कथा छान वाटल्या मला...पण एकंदरच पुस्तक खिळवून ठेवू शकले नाही...कदाचित लिहिण्याचा प्रकार- ललित मला आवडला नसेल..किंवा गोष्टींचा विषय आवडला नसेल किंवा माझे पूर्वगृह दुषित मन...माहित नाही....

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 9:41 PM   0 comments
एका तेलियाने
गिरीश कुबेर

तेल आणि तेला मुळे बदललेले जग - किती अपरिचित असतो ना आपण जगाच्या घटनांसंबंधी ज्या घटना आपल्यावर खूप सारा परिणाम करतात.
अहमद झाकी यामानी यांची ओळख आणि कर्तुत्व, तेलास्त्र ची ओळख , ओपेक ची स्थापना खूप साऱ्या जगाच्या पटला वर दूरगामी परिणाम करणाऱ्या गोष्टींचा गोषवारा
एका बैठकीत वाचायला हवे असे पुस्तक...

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 9:34 PM   1 comments
Thursday, July 14, 2011
श्री दीपलक्ष्मी - दिवाळी अंक 2010
कथा आणि माहितीपर लेख दोन्ही छान .... 'आई', 'तो आरसा'...
माहितीपर लेखांची निवड उत्तम

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 8:12 PM   0 comments
Tuesday, February 15, 2011
गंगा आयें कंहा से --- गुलजार, एका दिग्दर्शकाचा प्रवास
विजय पडाळकर

गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांचा लेखाजोखा (हा शब्द किती बरोबर आहे माहित नाही) किंवा माहितीपुस्तिका म्हणा (हा पण शब्द योग्य नाही कारण नुसती माहिती तर नक्कीच नाही मिळत आपल्याला)
मुळात गुलजार ह्यांच्या कलात्मक दृष्टीवर शंका घायचे कारणच नाही कोणाला...एवढे त्यांनी स्वतःला सिध्द केले आहे....कधी दिग्दर्शक म्हणून कधी कवी म्हणून...
पण तरीही दिग्दर्शक म्हणून त्यांनी एखाद्या चित्रपटाला कशी सुरुवात केली, कथा कशी आली, पात्रे कशी ठरली, दिग्दर्शकाला काय हवे होते, आता काय वाटते हे सर्व नक्कीच वाचनीय आहे
बरेचसे चित्रपट मी पाहिलेले नाहीत त्यामुळे मला त्यांची एक सफर घडून आली....
आणि चित्रपट आधीपासून चित्रपट पूर्ण होई पर्यंत सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत....

मला आवडले ते
चित्रपटांकडे पाहण्याची लेखकाची दृष्टी.....
विषयातील लेखकाला जाणवलेला, गुलजारना अपेक्षित असलेला आणि नक्की साधला गेलेला अर्थ....
लेखकाने गुलजारना प्रश्न विचारायला पण मागेपुढे पाहिलेले नाही....आता लेखक म्हणून त्यांनी त्यांची मते माडली आहेत ती बरोबर का चूक हे ज्याने त्याने ठरवायचे....
पण एका नवीन प्रकारचे पुस्तक ज्याने मला एक नवीन दृष्टीकोन समाजाला चित्रपटांविषयी विचार करायला....

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 9:14 PM   0 comments
पंखा
प्रकाश नारायण संत

गावाकडचे एक विश्व चितारले आहे लहान मुलाच्या नजरेतून....आपल्या नेहमीच्या जगातून बाहेर नक्कीच नेते हे पुस्तक

या पुस्तकातील नायक - सूत्रधार मुलगा - लंप्या - ज्याची नजर / विचार आपल्याला सगळे सांगतात तो किती वर्षाचा असेल हा प्रश्न राहून राहून मला सतावत होता पुस्तक वाचताना.....म्हणजे मग दिलेल्या प्रसंगांवरून त्याचे भावविश्व समजणे आणखी सोपे झाले असते नाही का?

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 3:59 PM   0 comments
Thursday, May 13, 2010
व्यक्ती आणि वल्ली
पु. ल. देशपांडे

यातील पात्रे आणि पात्रांना आपल्यात आणणारे पूल चिरंतर का आहेत हेच कळले वाचल्यावर.......
अक्षरश: ओळखीची झाली हे सर्व लोक त्यांच्या गुण-दोष सहित .....
मस्त एकदम...एखाद्या पात्राचे साधर्म्य असणारा माणूस आपल्या अवती भोवती शोधायचा ( आपले मन अपोआपच करते हे काम ) आणि मग त्या माणसा बरोबर प्रसंगाचे मोजमाप आपल्या पद्धतीने करायचे.....हा हा हा .....जाम मजा येते

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 6:06 AM   0 comments
Friday, March 5, 2010
शाळा
मिलिंद बोकील
अर्पणपत्रिका - 'शाळेत गेलेल्या सर्वांसाठी'
हे वाचूनच पुस्तक वाचायची ईच्छा झाली आणि उत्सुकता वाढली पण पुस्तक वाचून झाल्यावर पटलेही तितकेच....
एकदम मस्त पुस्तक मला माझ्या शाळेच्या दिवसात घेवून गेले.
पहिली काही पाने सर्व पात्रांचा परिचय होई पर्यंत धीमे वाटले पण नंतर एक आवश्यक तेवढी गती मिळाली.
रोज रात्री वाचन सुरु करताना किंवा थांबवताना पुढची उत्सुकता लागून रहायची.
मला हे आवडले की नववीच्या मुलाच्या डोळ्यातून त्याचे जग दाखवताना लेखकाने त्याच्या मानसिकतेचा पूर्ण विचार केला आहे. म्हणजे शब्द रचना किंवा विचार सरणी हि त्या वयाला भोवतालच्या परिस्थितीला शोभेल अशीच आहे. मुलांचे विनोद / शिव्या वात्रट वाटतील पण नववीला मुलगा असेच करतो. प्रेम प्रकरण तर सुरेख रेखाटली आहेत. शेवट उत्तम आणि अनपेक्षित पण पूर्णतः वास्तवाला धरून.
'केवडा' च्या प्रसंगातला वडिलांचा आधार मनाला भावाला.

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 6:20 PM   0 comments
इडली, ऑर्किड आणि मी
विठ्ठल कामत

यांच्या आयुष्यातील प्रवासाचे यतार्थ शब्दांकन एकदम साध्या शब्दात. यशासाठी असणारी त्यांची धडपड, passion , dedication , determination , अप्रतिम ....

Labels:

posted by संदीप वि.सबनीस @ 6:14 PM   0 comments